सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानामध्ये महानगरपालिकेचा देशामध्ये १४वा क्रमांक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशात सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज हे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा देशामध्ये १४ वा क्रमांक मिळाला आहे. अभियानाअंतर्गत ठरविण्यात आलेल्या निकषांना १००० इतके गुण होते. यापैकी कोल्हापूर महानगरपालिकेस ४७३.७८ इतके गुणांकन प्राप्त झालेले आहे.
      देशामध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या २४६ महानगरपालिकेच्या गटातून १४ वा क्रमांक महानगरपालिकेस मिळालेला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
      या अभियानामध्ये नागरिकांना स्वच्छतेसंबंधी तक्रार करण्याकरिता हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन देणे, व्हॉट्स ॲप नंबर उपलब्ध करुन देणे, नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात हेल्पलाईन व व्हॉट्सॲप नंबरविषयी जनजागृती करणे, सर्व प्रभागात ठिकठिकाणी वॉल पेंटींग करणे, होर्डिंग्ज लावणे, हँडपाम्पलेट वाटणे, पथनाटय सादर करणे इत्यादी स्वरुपाचे जनजागृती महापालिकेच्यावतीने करण्यात आली. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे वेळेवर निर्गत करणे, प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची व निर्गत केलेल्या तक्रारींची नोंद ठेवणे. तक्रारी निर्गत झालेनंतर नागरिकांनकडून फिडबॅक घेणे. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य पुरविणे, मेनहॉलमध्ये उतरुन कर्मचारी यांचेकडून सफाई करणे बंद करुन मशिनद्वारे साफसफाई करणे, कर्मचारी यांना आधुनिक साहित्य व उपकरणाद्वारे साफसफाई करणेचे प्रशिक्षण देणे, शहरातील नागरिकांच्या सेप्टीक टाकी दर तीन वर्षानी साफ करणे, सतत वाहनारे ड्रेनेज लाईन चेंबरचा सर्व्हे करुन त्यांची नियमितपणे साफसफाई करणे, संपुर्ण शहरातील सार्व. शौचायलयावर वॉल पेंटीग करणे, स्वच्छतेसंबंधिचे संदेश लिहणे, हेल्पलाईन नंबर प्रसिध्द करणे, वाहनांना जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टिम बसविणे, भिंती रंगविणे, नावीन्यपुर्ण उपक्रम राबविणे, शहरातील सेवाभावी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे, शहरामध्ये स्वच्छतेसंबंधी मोठया प्रमाणात घराघरामध्ये जनजागृती करणे, मलजलावर प्रक्रिया करणे, एस.टी.पी. प्लँट कार्यांन्वित असणे, सफाई कर्मचारी यांचे कामाची क्षमता वाढवणे हे या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानांचे निकष असून या सर्व निकषांचे केंद्रीय समिती टी.पी.आय. मार्फत ऑक्टोंबर २०२१ मध्ये शहरात पाहणी करण्यात आलेली होती. या समितीने नागरिकांचे फिडबॅक घेतले होते. यानंतर केंद्र सरकार सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाअंतर्गत महानगरपालिकेस देशात १४ वा क्रमांक दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!