घोडावत विद्यापीठाची सौजन्य वारी पोहचली दारोदारी

Spread the love


• १० हजाराहून अधिक गरजुंना पुरविली मदत
कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत विद्यापीठामार्फत गतवर्षी सुरु केलेल्या ”सौजन्याची वारी, आली आपल्या दारी” या उपक्रमामार्फत शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील जवळपास १० हजाराहून अधिक गरजुंना मदत पुरविण्यात आली आहे. यामध्ये गरजूना उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये देणगीदारांकडून नवीन व जुने वापरण्यायोग्य कपडे, वस्तू, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, चप्पल, बूट, पर्स, खेळणी, इलेक्ट्रिकल साहित्य पुरविण्यात आले.
       ग्रामीण भागातील गरजू गरीब लोकांची गरज ओळखून घोडावत विद्यापीठाने हा सौजन्य रथ सुरु केला होता. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामीण भागातून कौतुक होत आहे. संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजन्य रथाला दानशूर नागरिक, विद्यापीठाचे व्यवस्थापन, अधिकारी, समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी उपयुक्त साहित्यांची मदत दिल्यामुळे या सौजन्य रथाला गती प्राप्त झाली. एनएसएस विद्यार्थ्याचे गट तयार करून विद्यार्थांनी सौजन्य रथाच्या कार्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
       संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजन्य रथाने ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविला आहे. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील एक हजाराहून अधिक विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच नऊ हजाराहून अधिक गरजूंनी या रथातील उपलब्ध साहित्यांचा लाभ घेतला आहे. या उपक्रमास ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून सौजन्य रथ गावात गेल्यानंतर गावातील नागरिक सौजन्य रथाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. त्याचप्रमाणे गावातील गरजूंना हा सौजन्य रथ आपल्या गावामध्ये येणार आहे याची कल्पना गावामध्ये तीन दिवस अगोदर दवंडी देवून गरजूंनी साहित्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करून जणजागृती केली जाते.
      संजय घोडावत विद्यापीठाच्या रिसर्च व इंनोव्हेशन सेलच्या अंतर्गत हा उपक्रम राबविला जात असून संचालक डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे, समन्वयक आशिष कुलकर्णी, विद्यार्थी व टीम अथक परिश्रम घेत आहेत.
      या उपक्रमासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरु डॉ अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे व अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!