महापालिकेत कोव्हीड-१९ वॉररुम सुरु


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्‍याने शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरीकांना खाजगी व सरकारी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती २४ तास देण्याकरिता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे कोव्हीड वॉर रुम सुरु करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले होते.
      या वॉररुममध्ये २४ तास माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या वॉर रुममध्ये शहरातील कोणकोणत्या हॉस्पीटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची अचूक माहिती मिळणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उप-आयुक्त निखील मोरे यांच्या नियंत्रणाखाली हि वॉर रुम चोवीस तास कार्यरत ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोणकोणत्या हॉस्पीटलमध्ये किती बेड शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी टोल फ्री नंबर ०२३१-२५४५४७३ व ०२३१-२५४२६०१ या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोव्हीड-१९ साठी बेड उपलब्ध आहेत याची माहिती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *