शिवाजी विद्यापीठ वस्तीगृहात होणाऱ्या कोवीड केअर सेंटरची पाहणी

Spread the love

• महापालिका प्रशासक व पोलिस अधीक्षकांकडून पाहणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठ वस्तीगृह१,२,३ येथे सुरु करण्यात येणाऱ्या कोवीड केअर सेंटरला महापालिका प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
      शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ३५० बेडचे सेंटर सुरु झाले आहे. याठिकाणी ८४ व्यक्तिंना संस्थात्मक अलगीकरण केले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे आयसोलेशन येथे ७१ बेडचे कायम स्वरुपी कोवीड केअर सेंटर सुरु आहे. शिवाजी विद्यापीठ येथील १,२,३ वस्तीगृहमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या कोवीड केअर सेंटरची आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली.  
      याठिकाणची स्वच्छता, बेडची व्यवस्था, इलेक्ट्रीकचे व फायरचे ऑडीटची पुर्तता, ऑक्सीजन बेडची व्यवस्था व स्टाफची नियुक्ती तात्काळ करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे व पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या.
      महापालिकेने याचबरोबर शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व अंडी उबवणी केंद्र याठिकाणी कोवीड केअर सेंटरची तयारी पुर्ण केलेली आहे. शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी व आयसोलेशन येथील बेड जसजसे भरतील तसतसे इतर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. महापालिकेने याठिकाणी आवश्यक ती सर्व तयारी पुर्ण केलेली आहे.  
       यावेळी उपपोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिवाजी विद्यापीठ कुलसचिव डॉ.व्ही.डी. नांदवडेकर, प्रशासकी वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, सहा.अभियंता विद्युत चेतन लायकर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!