एसटी कर्मचाऱ्यांना कोविड१९ लस देण्यासाठी प्रयत्नशील: ना.सतेज पाटील

• महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड१९ ची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेतली असता व्यक्त केले.
     या भेटीमध्ये विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी एसटी कर्मचारी यांनी लॉकडाऊन कालावधीत कर्तव्य बजावले असून परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज शेकडो प्रवाशांशी संपर्क होत असलेने इतर वर्गाप्रमाणे सरसकट एसटी कर्मचारी यांना कोविड१९ ची लस देण्यात यावी, अशी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे संघटनेचे निवेदन देऊन मागणी केली.
     त्यावर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, एसटी कर्मचारी यांना  सरसकट कोविड१९ ची लस देणे आवश्यक असून त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन असे सांगून तातडीने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभाग यांना फोन करून कार्यवाहीसाठी सूचित केले.  तसेच याशिवाय आजच याबाबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाईल असे शिष्ठमंडळास आश्वस्त केले.
       शिष्टमंडळामध्ये विभागीय अध्यक्ष अनिता पाटील, विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर, विजय भोसले, बी. आर. साळोखे, एस. वाय. पवार, बी. डी. शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *