महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथे क्रिडाईतर्फे ६० ऑक्सीजन बेड


कोल्हापूर • प्रतिनिधी
      लाईन बझार येथील महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथील हॉलमध्ये क्रिडाई तर्फे ६० ऑक्सीजन बेड तयार करण्यात येणार आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्यासमवेत महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
     याठिकाणी दोन हॉलमध्ये क्रिडाई ६० ऑक्सीजन बेड तयार करुन देणार आहे व एक हॉल स्टाफसाठी ठेवण्यात येणार आहे. या ऑक्सीजन बेडचे डिझाईन व नियोजन तयार करुन देण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांना दिल्या. मागील वर्षीही क्रिडाई व रोटरी क्लबने महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर उभे केले होते. यावर्षीही प्रशासकांच्या आवाहनास प्रतिसाद देवून क्रिडाई ६० ऑक्सीजन बेडचे सेंटर तयार करुन देणार आहे. यानंतर प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी लसीकरण करण्यात येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रासही भेट दिली.
      यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोलकुमार माने आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *