क्रिकेट खेळाडूंनी खेळासाठी मेहनत, कष्ट व सरावावर भर द्यावा: समीर दिघे

Spread the love

• केडीसीएतर्फे क्रिकेट खेळाडू व पालकांसाठी कार्यशाळा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) च्यावतीने क्रिकेट खेळाडू व पालकांच्यासाठी आयोजित कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. धैर्यप्रसाद हॉल येथे गुरुवारी झालेल्या कार्यशाळेत भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांनी मार्गदर्शन केले.
      मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मैदान बंद असल्याने सर्वच खेळाडूंचे फार मोठे नुकसान होत आहे. खेळाडूंना सराव व स्पर्धा खेळण्यावर निर्बंध आल्यामुळे अनेक खेळाडू क्रिकेटपासून दुरावत चालले आहेत. तसेच अनेक खेळाडू व पालकांची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे या सर्व खेळाडू व पालकांना मार्गदर्शन करण्याच्या दॄष्टीने केडीसीएच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
      समीर दिघे यांनी मार्गदर्शन करताना, खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरू नये. खेळाडूंनी खेळासाठी मेहनत, कष्ट व जास्तीत जास्त सरावावर भर दिला पाहीजे. तसेच पालकांनी खेळाडूवर आपल्या अपेक्षा लादल्या नसल्या पाहीजेत, खेळाडूंना मोकळीक दयावी. पछर्वीपेक्षा आत्ता खेळामध्ये आधुनिकता व तंत्रज्ञान फार आले आहे, याचा उपयोग सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंनी केला पाहीजे. यासाठी सध्या लॉकडाऊनमध्ये खेळाडूंनी स्किल व फिटनेससाठी युट्युबचा वापर करावा असे सांगितले. खेळाडूंनी स्वत:मध्ये चांगले टेक्निक आत्मसात करण्यासाठी मॅट, टर्फ, सिमेंट विकेटचा वापर केला पाहीजे, यामुळे बेस चांगला तयार होतो. अनेक खेळाडू नेटमध्ये खूप चांगले प्रदर्शन करतात पण मॅचवेळी घाबरतात. यासाठी खेळाडूंनी मनातील भिती काढली पाहीजे, आव्हान स्विकारले पाहीजे व जास्तीत जास्त सामने खेळले पाहीजेत.
पालकांनी महिन्यातून एकदा तरी आपल्या खेळाडुविषयी कोचेस बरोबर बोलले पाहीजे
असेही त्यांनी सांगितले.
    समीर दिघे यांनी खेळाडू व पालकांच्या शंकांचे निरसन केले.
     यावेळी केडीसीएच्यावतीने समीर दिघे यांचे स्वागत केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर व अध्यक्ष चेतन चौगुले यांनी केले. तसेच या कार्यशाळेवेळी असोसिएशनच्या १२,१४,१६ व १९ वर्षाखालील खेळाडूंना ठक्कर ग्रुप,
ओम सिरॅमिक्स ॲणड ट्रेडिंग यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या बॅग ठक्कर ग्रुपचे प्रविण ठक्कर यांनी असोसिएशनकडे सुपुर्द केल्या.
     यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, खजानिस अभिजीत भोसले, सहसचिव कॄष्णात धोत्रे, सतिश लोंढे, किरण रावण, नितीन पाटील, प्रा.संजय पाठारे, विश्वजीत वरूटे, युवराज पाटील, संग्राम सुर्यवंशी यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव केदार गयावळ व आभार सहसचिव जनार्दन यादव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!