‘ गुरुवर्य डी.डी.आसगावकर ‘ गौरव पुरस्कार जाहीर ; शनिवारी वितरण
कोल्हापूर • प्रतिनिधी
शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ‘गुरुवर्य डी. डी. आसगावकर’ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी (दि.१३) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी ११:३० वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी विश्वस्त डी. जी. खाडे व संस्थेचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कुडित्रे (ता.करवीर) येथील गुरुवर्य डी.डी. आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टच्यावतीने स्व. डी.डी.आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १५ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्ती…..
श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटी इचलकरंजी, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आसुर्ले पोर्ले येथील मुख्याध्यापिका सौ. सीमा सुनील सांगरुळकर, हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक चुडाप्पा सागर कुमार, उत्तूर येथील श्री पार्वती शंकर विद्यालयातील सहाय्यक शिक्षक बाबूराव भिमराव पाटील, उषाराजे हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक सागर पांडूरंग वातकर, न्यू इंग्लिश स्कूल कुरूकलीचे सहाय्यक शिक्षक सुधीर पांडूरंग कांबळे, कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका गीता संजय मुरकुटे, श्री. विलासराव शामराव तळप-पाटील माध्यमिक विद्यालय गोगवे येथील सहाय्यक शिक्षक बाबासो मारुती कुंभार, नूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सहाय्यक शिक्षक शिवानंद बाबूराव घस्ती, श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणेरीचे सहाय्यक शिक्षक अमित अशोक शिंत्रे, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर येथील सहाय्यक शिक्षिका स्वाती विनोद पंडित, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खानापूरचे सहाय्यक शिक्षक विलास नारायण आरेकर, श्री. बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील वरिष्ठ लिपिक अभिजित बाळासाहेब गायकवाड, न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वरचे मुख्याध्यापक श्रीरंग अनिलकुमार गुरव.
———————————————–