डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डीवायपी सीईटी हॅकेथोन 2K21चा समारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलांमध्ये संशोधन गुणवत्ता वाढावी तसेच समाजाशी संलग्नित, उपयोगी व उद्योगविश्वाला उपयोगी प्रकल्प करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नुकतीच महाविद्यालयातील सर्व शाखांकरिता डीवायपी सीईटी हॅकेथोन 2K21 ही  महाविद्यालयीन स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली होती.
     या स्पर्धेकरिता बी. जे. कार्पोरेशन प्रा. लि.चे रवी बांदिवडेकर, हाडकर स्ट्रक्चरल कन्सल्टंसीचे प्रशांत हडकर तसेच सीनियर इंजिनियर, ई झेस्ट सोलुशन पुणे शुभम जानते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेकरिता महाविद्यालयांमधील विविध शाखेमधील जवळपास सर्वोत्तम चाळीस प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे सादरीकरण कौशल्य, ज्ञान, प्रकल्पाचा सामाजिक व औद्योगिक उपयोग इत्यादी बाबी बघून विविध विभागातून निकाल जाहीर करून त्यांना प्रशस्ती पत्रक व बक्षीस देण्यात आले.
                               स्पर्धेचा निकाल
• प्रथम क्रमांक – यश कवठेकर, साक्षी घाडगे, अतुल तेरणीकर (इएनटीसी विभाग)
• द्वितीय क्रमांक – आदित्य मोरे, सुश्रुत कित्तुरे, सौरभ गोरे, निखिल वरवडेकर, शुभम पवार (संगणक विभाग)
• तृतीय क्रमांक – मयुरी महाडिक, नाईक धुरी शितल, सावंत मिताली, संजीवनी पाटील (सिव्हिल विभाग)
व सबा लाड आर्किटेक्चर विभाग विभागून तसेच केमिकल, ई अंड टीसी, संगणक विभागाच्या प्रकल्प प्रकल्पना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
      स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रशांत वाडकर,  डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्यावेळी प्रस्तावना अधिष्ठाता संशोधन डॉ. अमरसिंह जाधव यांनी व सूत्रसंचालन प्रा.राधिका धनाल यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिष्ठाता उपस्थित होते.
     या स्पर्धेसाठी व बक्षीस समारंभासाठी आर अँड डी समितीचे प्रा. अजिंक्य यादव, प्रा. राहुल घाडगे, प्रा.किरण माने, प्रा.महेश शेलार, प्रा.सुप्रिया पाटील यां

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!