डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या परीकेषचे राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्यांदा यश

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी परीकेष बनसोडे याची नासा इंडिया (नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडन्टस ऑफ आर्किटेक्चर) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ‘लिक्सिल मेंटर्सशिप प्रोग्राम’ साठी सलग दुसऱ्या वर्षी  निवड झाली आहे.
      भारतातील सॅनिटरीवेअर उत्पादनांच्या विक्री करणाऱ्या लिक्सिल कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली होती. देशभरातील  विविध  महाविद्यालयाच्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. त्यामधून निवडलेल्या सर्वोत्तम विद्यार्थ्यामध्ये परीकेष बनसोडेची  निवड झाली.
     आर्किटेक्चर आणि अर्बन डिझाइनमधील गुणवत्तेच्या बदलत्या संकल्पना स्पष्ट करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. लिक्सिल मेंटर्सशिप प्रोग्राम गुरू आणि शिष्य यांच्यात होणाऱ्या परस्परसंवादावर लक्ष केंद्रित करतो.  मेन्टींना पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ८ पेक्षा जास्त आभासी सत्रांवर मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठाखाली मार्गदर्शकांसह राहण्याची आणि ‘क्रिएटिव्ह लर्निंग’ नावाच्या एकाच मिशनसाठी लक्ष्य ठेवण्याची संधी निर्माण करतो. या कार्यक्रमासाठी मेंटर म्हणून भारतातील नामांकित आर्कि. सिद्धार्थ तलवार आर्कि. हिरेन पटेल , आर्कि. इंद्रजित केंभावी, आर्कि. शारुख मिस्त्री आणि आर्कि. विवेक सिंग राठोड हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  पुढील दोन महिने परीकेष बनसोडे याला आर्की. इंद्रजित केंभावी यांचे  मार्गदर्शन मिळेल. यामध्ये विद्यार्थाच्या  भविष्यात येणाऱ्या व्यवसायिक मार्गातील अडचणी व त्यामधून यशस्वी मार्ग काढण्याची क्षमता, आर्किटेक्चरल डिझायनिंग आणि समुदायाचा विस्तृत दृष्टीकोन प्राप्त करणे, नेटवर्किंग आणि अनुभवावरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यंची क्षमता आणि कौशल्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
     या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले आहे. आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रो. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रो. आय. एस. जाधव व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
———————————————– Attachments area

ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!