शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वप्रथम

  
कोल्हापूर • प्रतिनिधी
    येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या  गुणवत्ता शिष्यवृत्तीकरीता शहरी गटातून प्रथम क्रमांक मिळाला. याबाबत विद्यापीठाने महाविद्यालयाचा प्रशिस्तपत्र देऊन गौरव केला आहे.
     दरवर्षी शिवाजी विद्यापीठाकडून सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार शहरी, निमशहरी आणि ग्रामीण गटातून विद्याशाखांनुसार गुणानुक्रमे महाविद्यालयांची निवड करण्यात येते. शैक्षणिक गुणवतेचा वसा घेतलेल्या कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात एक मानाचा  तुरा रोवला. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षांमध्ये  शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला  शहरी विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. शैक्षणिक निकाल, रोजगार, संशोधन  प्रकाशन, नाविन्यपूर्ण तसेच शोधक प्रकल्प इत्यादी अनेक बाबीमध्ये अग्रेसर असणारे हे महाविद्यालय विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कार्यरत असून तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
    संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उपाध्यक्ष नाम. सतेज डी. पाटील, विश्वस्त आम. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे , रजिस्टर डॉ. एल. वि. मालदे यांनी सर्व स्टाफ व इतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
………………………………………….
      आर्किटेक्चर विभागाचे यश 
      “इंडिया टुडे”च्या  सर्व्हेनुसार महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाने  देशात २५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच महाविद्यालयास विविध बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट देऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *