डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये
पर्यावरण दिनी व्हिडीओ निर्मिती स्पर्धा
कोल्हापूर • प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातर्फे ‘Think green, live green’ या संकल्पनेखाली ऑनलाईन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. व्हिडिओच्या माध्यमांतून पर्यावरणविषक एक छोटासा संदेश समाजामध्ये पसरवणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
बेस्ट व्हिडिओ एडिटिंग आणि बेस्ट व्हिडिओग्राफी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. बेस्ट व्हिडिओ एडिटिंगमध्ये अनिकेत सावंत यांना प्रथम, केदार पाटील द्वितीय तर मधुमती देसाई यांना तृतीय क्रमांक मिळाला. बेस्ट व्हिडिओग्राफीमध्ये साक्षी कदम यांना प्रथम, चिन्मय सुतार यांना द्वितीय तर विक्रम रसाळ यांना तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर, प्रा. पी. डी चौगुले, मेसा प्रमुख डी. ए. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी समन्वयक प्रथमेश सावंत, शिवम ढेरे, रसिका जाधव यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.