डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. अनिता गुणे यांना पीएचडी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभागाच्या (अॅनाटॉमी) प्रा. डॉ. अनिता राहुल गुणे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून पीएच. डी. जाहीर झाली आहे.  
     डॉ. अनिता गुणे यांनी ‘डिटेक्शन ऑफ अझुस्पर्मीक फॅक्टर (एझेडएफ) मायक्रोडीलेशन इन अझुस्पर्मीक अँड सेव्हर ऑलीगोस्पर्मीक मेल्स’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. आशालता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
     डॉ. गुणे यांच्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी.  वाय. पाटील एज्युकेशन सोसाययटीचे उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!