डी.वाय. पाटील अभियांत्रिकी बनणार तंत्रज्ञान हब

Spread the love

•सायन्स व टेक्नोलॉजी पार्कसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
कोल्हापूर • प्रतिनिधी
      पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (सायटेक पार्क) च्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, जीआयएस मॅपिंग आणि ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजीमधील संशोधन, नवोपक्रमांना गती मिळणार आहे. या सेंटरमुळे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय नवे तंत्रज्ञान हब बनेल व संशोधनामध्ये कोल्हापूरचे नाव नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड व महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता  यांनी व्यक्त केला.
      सुमारे ८ कोटीच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या केंद्राबाबतच्या सामजस्य करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या झाल्या. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्यावतीने अध्यक्ष माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे व डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सायटेक पार्कचे समूह संचालक विक्रम सराफ, आयएसटीई,नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई,  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, श्रीधर करंदीकर, कृषी विभागाचे सहसंचालक उमेश पाटील,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे आदी उपस्थित होते.
      स्थानिक विद्यार्थी, परिसरातील उद्योग, उद्योजक व प्राध्यापक यांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या विकासासाठी मदत करणे हा ‘सीआयआयआय’चा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण, प्रशिक्षण, स्कीलिंग, रीस्कीलिंग व अपस्कीलिंग यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापन होणारे हे  केंद्र मदत व मार्गदर्शन करणार आहे.
     केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाकडून पुणे येथे १९८६ मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कची स्थापना करण्यात आली आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्रात समन्वय साधून संस्थात्मक व पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी विविध सल्ला सेवा पुरविणे, उद्योगजगत – शिक्षण विश्व व सरकारमधील दुवा म्हणून काम करणे, उद्योजक, संशोधक व उद्योगांना गरजेनुसार आवश्यक तांत्रिक व्यवस्थापन प्रशिक्षण देणे, ज्ञान व संसाधन व्यवस्थापनात महत्वाची भूमिका निभावणे हे ‘सायटेक पार्क’चे मुख्य उद्देश आहेत. तंत्रज्ञान, बिझनेस इंक्यूबेशन व उद्योजक विकास, पर्यावरण नियोजन, शाश्वत विकास आणि सामाजिकता, नवोपक्रम आणि सीएसआर आधारीत सामाजिक प्रकल्प, प्रगत कौशल्य प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये सायटेक पार्कचे काम चालते. 
      कोल्हापूरमधील उद्योजकीय विकासासाठी ‘सायटेक पार्क’ने गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन अँड इंक्यूबेशन इन माध्यमातून मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, जीआयएस मॅपिंग आणि अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी’ हे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
           उद्योगपूरक मनुष्यबळ तयार होणार: डॉ. संजय पाटील
     सीआयआयआयच्या स्थापनेमुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यानाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी महविद्यालये, पॉलीटेक्निक आणि आयटीआयचे विद्यार्थी आणि प्राध्यापकाना फायदा होणार आहे. उद्योगजगतातील प्रतिनिधींनी आपल्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षणासाठी या केंद्रात पाठवावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योगामध्ये इंटरनशिपसाठी निमंत्रित करावे व या केंद्राच्या माध्यमातून त्यांना प्रकल्प प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे अत्यधुनिक ज्ञानाने परिपूर्ण असे उद्योगसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करता येईल. इंक्युबेशन व स्टार्ट अप साठीही त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर अभियांत्रिकी महविद्यालये, पॉलीटेक्निक आणि आयटीआय यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या प्रशिक्षणासाठी सामजस्य करारासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले.
             सीआयआयमुळे विकासाचक्र गतिमान: डॉ. गुप्ता
     डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी ग्रुपचे या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्य व आचिव्हमेंट यांची माहिती देणारे प्रेझेन्टेशन सादर केले क्रिएटिव्हिटी, क्यूरासिटी व कॉलबरेशन हे तीन सी एकत्र आल्यास सर्वच क्षेत्रात वेगवान प्रगती शक्य असल्या हे सांगत ‘सीआयआयआय’ च्या माध्यमातून हे कार्य वेगाने पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या केंद्राचे कार्य व महत्व, त्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या विविध लॅब व त्याचे फायदे याबाबत माहिती दिली.
     यावेळी विविध स्मॅक, गोशिमा, कागल मन्युफक्चरिंग, फौन्डरी असोसिएशन, आयटी अंड इलेक्ट्रिकल असोसिएशन, आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन यांचे पदाधिकारी, उद्योजक, अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलीटेक्निक आणि आयटीआयचे प्राचार्य, डी. वाय. पाटील ग्रुप संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुलिका भूमकर  व प्रा. राधिका ढणाल यांनी केले तर डॉ. सुनील रायकर यांनी आभार मानले.
——————————————————- ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!