डी.वाय. पाटील विद्यापीठ जागतिक ख्याती मिळवेल: जिल्हाधिकारी राहुल रेखावर

Spread the love


• डॉ.जे.एफ.पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
कोल्हापूर • प्रतिनिधी
     डी. वाय. पाटील विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून येथील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करत आहेत. नालंदा व तक्षशिलासारख्या महान विद्यापीठप्रमाणे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नावही मूल्यशिक्षणासाठी जागतिक स्तरावर अग्रगण्य राहिली असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केल. कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्याच्या १६व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
     दरम्यान, अर्थतज्ञ डॉ.जे.एफ. पाटील यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ “जीवनगौरव” पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. चांदीचे स्मृतिचिन्ह एक लाख रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
    डी.वाय. पाटील विद्यापीठाचा वर्धापनदिन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने साजरा करण्यात आला. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्रकुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर विद्यापीठ गीत झाले.
   हॉटेल सयाजी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध मान्यवर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
     डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनाखाली १९८९मध्ये सुरू झालेल्या मेडीकल कोलेजने केवळ १६ वर्षात डीम्ड युनिव्हर्सिटीचा (अभिमत विद्यापीठ) दर्जा संपादन केला. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संशोधनाचीही संधी उपलब्ध करून दिली. आज बदलत्या काळाचा वेध घेत असताना शिक्षणातील गरज ओळखून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एकाच छत्राखाली सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लवकरच बहुमजली इमारत उभारण्याचा मानस कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. 
      प्र-कुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, स्कूल ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य जावेद सागर, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधिर बारदेस्कर, स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचे प्रा. डॉ. आर एस पाटील, स्कूल ऑफ नर्सिंग प्राचार्य सुचित्राराणी राठोड, मेघराज काकडे, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, अशोकराव देसाई ॲड. रवी शिराळकर आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!