दहीहंडी स्पर्धेच्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत करणार: पृथ्वीराज महाडिक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहीहंडी स्पर्धेचे आयोजन होणार नाही. त्यामुळे ३ लाख रुपयांच्या बक्षिसांसह स्पर्धा संयोजनासाठी येणार्‍या खर्चाच्या रकमेतून यावर्षी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला आहे.
     श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटले, की कोल्हापूरवासियांना आठवते, ती धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी. दसरा चौकात हजारो तरुणांच्या साक्षीने क्षणक्षणाला वाढत जाणारी चुरस आणि दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी अवघे कोल्हापूरकर गर्दी करतात. मात्र कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीचा थरार कोल्हापूरवासियांना अनुभवता आलेला नाही.
     उत्साही आणि जल्लोषी वातावरणात दहीहंडीचा अविस्मरणीय सोहळा दरवर्षी रंगतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे दहीहंडी स्पर्धा होऊ शकली नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग कधी कमी होता आणि दहीहंडीचा जल्लोष, थरार पुन्हा कधी अनुभवायला मिळतो, याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यावर्षीही कोरोना संसर्गामुळे स्पर्धा होणार नाही. मात्र स्पर्धेच्या ३ लाख रुपये बक्षिसाच्या रकमेसह स्पर्धेच्या संयोजनासाठी होणार्‍या लाखो रुपयांच्या रकमेतून जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय धनंजय महाडिक युवा शक्तीने घेतला आहे. युवा शक्तीच्या कमिटी सदस्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.
     लवकरच या रकमेतून पूरग्रस्तांना विविध मार्गांनी मदत करणार असल्याची महिती माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोणत्याही आपत्तीवेळी सर्वप्रथम धावून जाण्याची महाडिक कुटुंबाची दातृत्वशील परंपरा आहे. दहीहंडीच्या आयोजनाची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेऊन, या परंपरेत महाडिक कुटुंबाने आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
——————————————————-
 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!