कोल्हापूर • प्रतिनिधी
श्री क्षेत्र जोतिबा येथे दर रविवारी व पन्हाळा येथे दैनंदिन केएमटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र जोतिबा – वाडी रत्नागिरी येथे चैत्र पौर्णिमा यात्रा तसेच प्रवासी नागरीक व भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत एस.टी.स्टँड येथून श्री क्षेत्र जोतिबा – वाडी रत्नागिरीसाठी २० मार्चपासून दर रविवारी बससेवा सुरु करण्यात येत आहे. सकाळी एस.टी.स्टँड व जोतिबा येथून सकाळी ७:१५ ते सायंकाळी ५:१५ वाजता या वेळेत प्रत्येक १ तास १५ मिनिटांचे अंतराने बस धावेल व सायंकाळी १७:३० वाजता शेवट बस जोतिबा मार्गावर धावेल. तसेच पन्हाळा मार्गावर (बुधवार पेठपर्यंत) २१ मार्चपासून दैनंदिन तीन खेपांद्वारे बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.