अंबाबाई मंदिरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. १९ मार्चपासून श्री करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी देवीचे दर्शन सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेता येईल. सायंकाळी ६ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार असल्याचे पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
      या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१७) बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी मंदिर तसेच ओढ्यावरील गणपती – सिध्दीविनायक मंदिर, आझाद चौक येथील श्री दत्तभिक्षालिंग देवस्थान, महाद्वार रोडवरील श्री बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौकातील श्री पंचमुखी मारुती, टेंबलाई टेकडीवरील श्री त्र्यंबोली देवस्थान, कात्यायनी-बालिंगा येथील श्री कात्यायनी देवी याठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सलग खुले राहिल. सायंकाळी ६ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल.
     भाविकांनी दर्शनासाठी येताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. दर्शन रांगेत सुरक्षित अंतर ठेवावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
———————————————–  

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!