कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्री करवीरनिवासिनी अंबाबाई – महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गुरूवार दि. २५ फेब्रुवारीपासून दर्शनाची वेळ बदलली आहे. सकाळी ६ ते रात्री ८ अशी असलेली वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेल्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. भाविकांकडून मंदिरात करण्यात येणारे अभिषेक वगैरे धार्मिक विधी बंद केले आहेत. दर्शनासाठी असलेली ई – पासची सुविधा बंद केली आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदीर परिसरात विनामास्क कोणी आढळल्यास रूपये २००/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टंन्ससह सँनिटायजर हातावर घेऊन दर्शनाला सोडले जाईल. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात फोटो काढतांना आढळल्यास मोबाईल फोन जप्त केले जातील, अशी माहिती पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
यावेळी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पुजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर उपस्थित होते.
———————————————–
Hide forever. cialis price Below are the names of a range of different sleeping pills.