डी.सी.नरके फुटबॉल स्पर्धेचा आज किक-ऑफ


कोल्हापूर • प्रतिनिधी
      स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय खुल्या फुटबॉल स्पर्धेचा किक-ऑफ  रविवारी (दि.१४) होत आहे. कुडित्रे (ता. करवीर) येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर स्पर्धेतील सामने होतील. सांगरूळ फुटबॉल क्लबने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
      स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आम. चंद्रदीप नरके आणि अजित नरके यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या फुटबॉल स्पर्धेचे ९ वे वर्ष आहे. ग्रामीण भागातील फुटबॉलला चालना देण्यासाठी होत असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील ग्रामीण व शहरी संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील सहभागी संघांमधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू खेळणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघास २१ हजार रुपये तर उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक देण्यात येईल. तृतीय क्रमांकास ११ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक बक्षीस आहे.
      स्पर्धेचे उदघाटन सायंकाळी चार वाजता गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली तर कुंभी-कासारी सह. साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके आणि कुंभी बॅंकचे चेअरमन अजित नरके यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमास देवराज नरके, राजवीर नरके, संदीप शेलार, निवास वातकर, अजित पाटील, संजय पाटील, सुधीर खाडे, दादासो लाड, सुशांत नाळे, प्रकाश दौ. पाटील, सरदार खाडे, प्रकाश पाटील (पीडी), बाजीराव वातकर, अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे.
⚽  रविवारी होणारे सामने ⚽
⚽ पाडळी एफसी (बी) – जय विजय कळंबा
⚽ यवलूज एफसी – निगवे एफसी
⚽ बालिंगा एफसी – चव्हाणवाडी एफसी
⚽ कोगे एफसी (बी) – वडणगे एफसी
⚽ बीड एफसी – इस्पुर्ली एफसी
⚽ वडणगे स्पोर्ट्स -मावळा एफसी उचगाव
⚽ खुपिरे एफसी – वाशी एफसी
⚽ पन्हाळा एफसी- शिंगणापूर एफसी
⚽ पाडळी एफसी (अ)- डी.सी.बॉईज
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *