डी. सी. नरके चषक फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

Spread the love

• पाडळी, निगवे, बालिंगा, वडणगे, बीड, वडणगे स्पोर्टस, वाशी, पन्हाळा  संघांची विजयी सलामी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      स्व. डी.सी. नरके चषक राज्यस्तरीय खुल्या फुटबॉल स्पर्धेला रविवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.  कुडित्रे (ता.करवीर) येथे डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात  पाडळी अ अाणि ब, निगवे, बालिंगा, वडणगे, बीड, वडणगे स्पोर्टस, वाशी, पन्हाळा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सलामी दिली.
     सांगरूळ फुटबॉल क्लब आयोजित
स्पर्धेचे उदघाटन सायंकाळी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली तर कुंभी-कासारी सह. साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके आणि कुंभी बँक चेअरमन अजित नरके यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास देवराज नरके, राजवीर नरके, संभाजी नाळे, संदीप शेलार, निवास वातकर, अजित पाटील, संजय पाटील, सुधीर खाडे, दादासो लाड, सुशांत नाळे, प्रकाश दौ. पाटील, सरदार खाडे, प्रकाश पाटील (पीडी), बाजीराव वातकर, अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
     स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्ध पाडळी एफसी (ब) संघाने जय विजय कळंबा संघावर विजय मिळवला. निगवे एफसीने यवलूज एफसीवर टायब्रेकरवर ५-२ अशी मात केली. बालिंगा एफसीने चव्हाणवाडी एफसीवर २-० ने विजय मिळवला. वडणगे एफसीने कोगे एफसी (ब) वर मात केली. बीड एफसीने इस्पुर्ली एफसीवर विजय मिळवला. वडणगे स्पोर्टसने मावळा एफसी उचगाव संघावर टायब्रेकरवर ४-२ ने मात केली. वाशी एफसीने खुपीरे एफसीवर विजय मिळवला. पन्हाळा एफसीने शिंगणापूर एफसीवर मात केली. पाडळी एफसी (अ)ने २-० गोलने डी.सी. बॉईज संघावर विजय मिळवला.
———————————————– Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!