अत्याधुनिक आरोग्य बस सेवेचे लोकार्पण


कोल्हापूर • ( जिमाका )
     राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड व चंदगड तालुका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे ४० लाख रुपये किंमतीची अत्याधुनिक ‘मोबाईल मेडिकल युनिट बस ‘
राज्यस्तरावरुन प्राप्त झाली. या अत्याधुनिक आरोग्य बस सेवेचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शेंडापार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात आज करण्यात आले. 
      या रुग्णसेवेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी श्री. पाटील यांनी केले. या अत्याधुनिक बसद्वारे गंभीर आजारी, व्याधीग्रस्त रुग्ण तसेच दुर्गम भागातील लोकांना बाहय रुग्णसेवा, थुंकी, कोवीड संशयितांची रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तपासणी, रक्त,लघवी तपासणी, दंत चिकित्सा, एक्सरे अहवाल तपासणी, वेळप्रसंगी दुर्गम भागात गरोदर मातांची प्रसुतीची सुविधाही या अत्याधुनिक बसमध्ये आहे. नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने या बसमध्ये वैदयकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे.
     या कार्यक्रमासाठी अर्जुन आबिटकर, राज्य कुटुंब कल्याण उपसंचालक डॉ. राम  हंकारे, उपसंचालक डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल माळी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . उषादेवी कुंभार, निवासी वैदयकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ. हर्षला वेदक, प्राचार्य सुप्रिया देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *