संजय घोडावत विद्यापीठात वायपीव्ही साधना ॲपचे लोकार्पण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     नवरात्रीच्या मुहूर्तावर घटस्थापनेला संजय घोडावत विद्यापीठ येथे वायपीव्ही साधना ॲपचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सौ.नीता घोडावत, योग प्राण विद्याचे संस्थापक एन.जे.रेड्डी, विशाखा करनानी इंदौर, सौ. पूजा लढ्ढा, अभय लढ्ढा, डॉ.मंजू राठी जयपूर, स्तंभलेखक राजेश मंडोरे जळगाव, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील आदी उपस्थित होती.
     जीवन जगताना आम्ही जरी सुख समाधानाने जगत असलो तरी मानवतेच्या नात्याने आपली जबाबदारी आहे की, दुसऱ्यांचे जीवनात आम्ही सुख, शांती, समृद्धीसह हास्य चेहऱ्यावर आणणे हे खरे जीवन आहे. तरच आपले जिणे हे सार्थक होते. स्वर्गमय जीवन ह्यालाच म्हणतात हे अनमोल विचार असणारे सेवानिवृत्त वायुसेना विंग कमांडर ऊर्जागुरु एन.जे.रेड्डी, चेन्नई यांनी योग प्राण विद्येची स्थापना केली आहे.
     योग प्राण विद्याची उपचार पद्धतीने शारीरिक, मानसिक व भावनात्मक विकास होतो. एखादे व्यक्तीचे शरीरात आजार नाही म्हणजे व्यक्ती स्वस्थ आहे असे नाही तर मानसिक संतुलन, अध्यात्मिक विकासासह सामाजिक समरसता महत्वाची आहे, यास आता जगानेही मान्यता दिली आहे. योग्य प्राण विद्येचे हे विचार, शारीरिक व्यायाम, साधना, श्वसन क्रिया, प्रार्थना, ध्यान, नो ड्रग नो टच थेरपी उपचार पद्धत हे सर्व सम्मिलीत करून एका अद्भुत अँपचे लोकार्पण नवरात्रीच्या मुहूर्तावर घटस्थापनेला संजय घोडावत विद्यापीठ येथे एका साध्या कार्यक्रमात करण्यात आले आहे. 
     या ॲपमध्ये श्वसन पद्धती, क्षमा साधना, पृथ्वी शांती ध्यान, सुपर ब्रेन आसन, हीलिंग उपचार पद्धत निःशुल्क मराठी हिंदीसह अनेक भाषेत उपस्थित आहे. अधिक माहितीसाठी पूजा लढ्ढा, ट्रेनर व हिलर राजेश मंडोरे यांच्याशी ७७७६०८९१७८ वर संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!