कोल्हापूर • प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ कोल्हापूर शहर युवक अध्यक्षपदी दीपक राजाराम खांडेकर यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत अखिल महाराष्ट्र समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ मोरे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नागरे यांच्यावतीने त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
दीपक खांडेकर हे चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी समाजकार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे समाजाचा विकास निश्चित होत आहे. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या चर्मकार समाजातील कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या राज्य कार्यकारणी व शहर कार्यकारणीवर कोल्हापूर शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दीपक खांडेकर यांच्या निवडीसाठी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे, शहर अध्यक्ष रमेश टोणपे, राज्य सल्लागार समिती सदस्य दामाजी रोटे, राज्य उपाध्यक्ष एम.के. चव्हाण, तालुकाध्यक्ष गोकुळ कांबळे, शहर उपाध्यक्ष अजित अंकारे, संघटक तानाजी महाजन, सचिव जीवन पोवार, रामदास कांबळे आदींचे सहकार्य लाभले.