रामानंदनगर परिसरातील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी

• राहूल चिकोडेंनी जलअभियंतांच्या निदर्शनास आणल्या समस्या
कोल्हापूर • प्रतिनिधी
     उपनगर म्हटले कि पाणीसमस्या ही कोल्हापूरसाठी नवीन बाब नाही. रामानंदनगर परिसरदेखील याला अपवाद नाही. अनियमित, अशुद्ध आणि अवेळी येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे रामानंदनगर परिसरातील नागरिक विशेषतः महिलावर्गात प्रचंड नाराजी आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी रामानंदनगरमधील पाणी प्रश्नासाठी जलअभियंता श्री. साळोखे यांना रामानंदनगर भागात प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलवून समस्या निदर्शनास आणून दिल्या.
      रामानंदनगर हे नेहमीच काहीतरी समस्येच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत असणारा भाग आहे. स्वच्छता, गटार, रस्ते, दरवर्षी ओढ्याचे पाणी घरात येणे अशा समस्यांनी हा भाग ग्रस्त आहे. त्यातच कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा होणे व अस्वच्छ पाणी पुरवठा होणे यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. म्हणून आज राहूल चिकोडे यांनी जलअभियंता साळोखे यांना हा परिसर फिरवून दाखवून समस्या सांगितल्या. यावर जलअभियंता साळोखे यांनी येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा नियमित सुरु करण्याबाबत आश्वासन दिले.
     यावेळी संदीप इंदूलकर, सर्जेराव शिंदे, अनिल भोई, ताजुद्दीन सिद्धनाळे, बाजीराव काटे, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर, जयदीप मोरे आदींसह रामानंदनगर परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *