सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करण्याची मागणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करावे,अशी मागणी उत्तरेश्वर पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ संयुक्त शिवसेनेच्यावतीने महापालिका उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर यांच्याकडे शिष्टमंडळाने केली.
     कोल्हापूरात सार्वजनिक गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. मंडळांच्यावतीने गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किशोर घाटगे व सुशील भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांना भेटून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करावे अशी मागणी केली.
     त्याचबरोबर गणेश आगमन व विसर्जन होणाऱ्या ठिकाणचे युद्धपातळीवर डांबरीकरण करावे. गंगावेश, शिवाजी पूल व  इराणी खण मार्ग सुस्थितीत करावा. घरगुती गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची ठिकाणे निश्चित करावीत व तरुण मंडळे आणि संस्था सहकार्य म्हणून विसर्जन कुंडे करणार असतील तर त्या गणेशमूर्ती नेण्यासाठी वाहन व्यवस्था करावी. प्रत्येक विसर्जन कुंडाजवळ निर्माल्य कुंडाची व्यवस्था करावी व त्याचा उठाव करावा तसेच इराणी खण येथे गणेशमुर्ती विसर्जित होतात त्याठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या.
     यावेळी रियाज बागवान, सनी अतिग्रे, राकेश पोवार, सागर कलकुटगी, अनिकेत जाधव, शुभम बागल, रईस बागवान आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!