गणेशचतुर्थी दरम्यान पूजेसंबंधी सेवांची मागणी ७२ टक्के वाढली: जस्ट डायल

Spread the love

• मुंबई, पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्रामध्ये कोविडचे रूग्ण कमी होत असल्यामुळे, सर्व स्थानिक पुजा सेवांची मागणी वाढली असून यावर्षी गणेश चतुर्थीदरम्यान ७२ टक्के लक्षणीय वाढ झाली आहे, हे भारताच्या क्रमांक १ चे हायपर-लोकल सर्च इंजिन जस्ट डायल लिमिटेड (BSE: 535648, NSE: JUSTDIAL) ने केलेल्या नवीन ग्राहक सर्व्हेवरून समोर आले आहे.
     गतवर्षी कोविड-१९ लॉकडाऊनने घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मर्यादा होत्या. यावर्षी मागणीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षीसुद्धा प्रशासनाचे कडक निर्बंध होते परंतु तरीसुद्धा या दहा दिवसच्या कालावधीत मागणीमध्ये वाढ झाली होती. कारण राज्यात कोविडच्या रूग्णांमध्ये घसरण झाली आहे.
    महाराष्ट्रामधील उत्सव साजरीकरणासाठी मुर्तीकार, मंडप करणारे, पंडित, पुजा साहित्य विक्रेते, मिठाईची दुकाने, फुल विक्रेते यांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे जस्ट डायलने आपल्या सर्व्हेमध्ये नमूद केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मंडप, गुरुजी आणि मिठाई दुकाने यांची मागणी यावर्षी वाढली आहे. 
     एकूणच, राज्यभर मागीलवर्षीच्या गणेशचतुर्थीच्या तुलनेत यंदा मंडपची मागणी १२० टक्केने वाढली. मिठाई दुकानांची मागणी ११२ टक्के, गुरुजींची मागणी ८८ टक्के, फुल विक्रेत्यांची मागणी ३१ टक्के, मुर्तीकारांची मागणी २५ टक्केने वाढली.
     मुंबईतील फुलांच्या विक्रेत्यांची मागणी इतर सर्व शहरांपेक्षा मागे पडली असताना पुण्यात त्याच्या मागणीत १०० टक्के वाढ झाली, त्यानंतर नागपूरमध्ये वाढ झाली. मुर्तीकारांसाठी, नागपूरमध्ये सर्वात जास्त मागणी म्हणजेच १६७ टक्के वाढ झाली. त्यानंतर मुंबई येथे झाली परंतु नाशिकमध्ये ती स्थीरच राहिली. 
     मंडपसाठी, मुंबईची मागणी इतर प्रमुख शहरांपेक्षा पुढे होती परंतु नागपूर आणि पुणे दोन्हींमध्ये ही मागणी वाढली होती. परंतु पुणे येथील भाड्याने-बिछायत मागणीने मुंबई, नाशिक आणि नागपूर यांना मागे टाकले. पुजा साहित्य विक्रेत्यांसाठीसुध्दा पुण्याने ३० टक्के मागणी वाढीची साक्ष दिली आणि त्यानंतर नागपूर आणि कोल्हापूर या शहरांनी. मुंबई येथे मिठाई दुकानांची ग्राहक मागणी मोठी होती तर पुणे, नागपुर आणि कोल्हापूर येथे सुद्धा त्यात वाढ दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!