महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
   महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट येऊन काल महाराष्ट्रात याचे प्रतिसाद उमटले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे वीज कनेक्शनची तोडणी सुरू आहे, याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे रास्ता रोको करून तीव्र निदर्शने करण्यात आली.
     स्पर्धा परीक्षेची तारीख पुढे ढकलली असे समजताच विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. ऐनवेळेस ही परीक्षा सहाव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाबाबत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन रास्तारोको करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एमपीएससी परिक्षांर्थी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, वीज कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या निर्लज्ज महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा व निषेधाचे फलक दाखवण्यात आले.
      यावेळी एमपीएससी परीक्षार्थी संदेश हजारे व विशाल पाटील यांनी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या मतभेदामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर अन्याय आणि आमचे भविष्य अंधारात लोटत असल्याची खंत व्यक्त केली. भाजपा जिल्हा सरचिटणीस विजय जाधव,  सरचिटणीस हेमंत आराध्ये, अशोक देसाई व जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी आपल्या भाषणात आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारचा मनमानी कारभार सुरु असल्याचे सांगितले. वीज बिल आणि परिक्षांचा तारखा बदल करणारे सरकार हे घूमजाओ सरकार असल्याचे सांगितले.
     यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना भेटून  निवेदन दिले.
     यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय आगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, आशिष कपडेकर, मामा कोळवणकर, विशाल शिराळकर, अमर साठे, नरेंद्र पाटील, सचिन सुतार, सचिन जाधव, रविंद्र घाटगे, अक्षय निरोखेकर, भगवानराव काटे, पृथ्वीराज जाधव, अतुल चव्हाण, विराज चिखलीकर, सचिन साळोखे, अमर पवार, सुमित पाटील, कृष्णा आतवाडकर, प्रथमेश पाटील, आकाश दळवी, सिद्धेश्वर पिसे, प्रमोद पाटील, ओंकार खराडे, धीरज पाटील, संजय जासूद, विजय पाटील, प्रसाद मोहिते, कालिदास बोरकर, इक्बाल हकीम, मानसिंग पाटील, बापू राणे, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, गौरव सातपुते, दिनेश पसारे, विजय गायकवाड, सुनील पाटील, रोहित कारंडे, महेश यादव, महादेव बिरंजे, किशोर लाड, अप्पा लाड, वल्लभ देसाई, निरंजन घाटगे, रहीम सनदी, सिद्धांत भेंडवडे, पुष्कर श्रीखंडे, गिरीष साळोखे, निलेश आजगावकर, राहुल लायकर, आनंद मिठारी, श्रीकांत पाटील, संभाजी रणदिवे, भिकाजी मंडलिक, महादेव मंडलिक, मिसाळ अर्जुन, सुधाकर मातुगडे, आनंद ढेंगे, चंद्रकांत ओतारी, दाजी पठाडे, विजय यादव, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, मंगल निपाणीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!