उपायुक्त शिल्पा दरेकर यांची सावित्रीबाई फुले रुग्णालयास भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी आज सावित्रीबाई फुले हॉस्पीटल व पंचगंगा रुग्णालयातील प्रसुती विभागास अचानक भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी  प्रसुती विभागातील सुविधांचा आढावा घेतला. या हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या गरोदर व प्रसुत मातांना महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दूध, नाष्टा व दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. यावेळी मंजूर ठेकेदाराकडून नाष्टा व जेवण दर्जेदार दिले जाते का नाही याची शहानिशा त्यांनी केली. या पाहणीनंतर त्यांनी अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यात येतील असे सांगितले.
      यानंतर उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉर्डचीही पाहणी केली. या वॉर्डमधील फरशा फुटलेल्या आहेत. त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना संबंधीत अभियंताना दिल्या. या फरशा ज्या ठेकेदारामार्फत बसविल्या आल्या आहेत त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी सांगितले. प्रसुत मातांना देण्यात येणाऱ्या दूध, नाष्टा, जेवणाचे रजिस्टर व हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर व नोंद रजिस्टरची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर हॉस्पीटलमधील सुविधाबाबत कोणतीही तक्रार असल्यास तक्रार पेटीमध्ये देण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. हॉस्पीटमधील रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी सोशल डिस्टंन्सीचे पालन, रुग्णालयामध्ये स्वच्छता, रुग्णांनी व नातेवाईक मास्कचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.
      यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजूश्री रोहिदास यांनी रुग्णालयामधील प्रसुतीगृहामधील कोरोना विषाणूबाबत व इतर सोयीसुविधा तसेच सावित्रीबाई फुले रग्णालयामध्ये प्रसुत मातांची कोरोना विषाणू संगर्गाबाबतची घेतली जाणारी खबरदारीची माहिती दिली. यावेळी महिला व बालकल्याण अधिक्षक सौ. प्रिती घाटोळे, कनिष्ठ लिपीक शिवाजी आगलावे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!