कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटीच्या को-चेअरमनपदी व महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी समितीवर निवड झाल्याबद्दल गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटीच्या को-चेअरमनपदी व महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. त्यांची निवड होणे गोकुळ परिवारास अभिमानास्पद आहे. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक चेतन नरके म्हणाले की, माझ्या जडणघडणीमध्ये गोकुळचे योगदान मोलाचे असून मला मिळालेल्या पदाचा उपयोग शेती, उद्योग, बँकिंग, शैक्षणिक या क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहू.
याप्रसंगी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजीतसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————-