कोल्हापूर • प्रतिनिधी
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. गेली सात वर्षे फक्त इव्हेंट व इमेज मॅनेजमेंट यामध्ये सरकार अडकून पडल्याने सर्वसामान्य माणूस संकटाच्या गर्तेत सापडला आहे. मोदी सरकारच्या सात वर्षातील काळ्या कारभाराचा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या या कारभारा विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियोजनानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनात आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,
आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लानी, सचिन चव्हाण, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, दिपक थोरात, पार्थ मुंडे, बाळासाहेब खाडे, अक्षय शेळके, उदय पोवार, सर्फराज रिकीबदार, प्रवीण पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, मंगल खुडे, पूजा आरडे, उज्वला चौगले, वैशाली पाडेकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————–