कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्याचे वाटप

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून धनादेशांचे वितरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात झाले.
     या योजनेचे लाभार्थी लता कुंडलिक कांबळे – बाचणी, साखरूबाई शिवाजी पाटील – बोळावी, वनिता प्रकाश कांबळे – चिमगाव, हौसाबाई बाळू कोकणे – नानीबाई चिखली यांना चेक प्रदान करण्यात आले.
     यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य सदाशिव तुकान व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!