कोल्हापूर • प्रतिनिधी
महापालिकेच्यावतीने सराफ व्यावसायिकांना लागू केलेली फायर फी हटविल्याच्या आनंदाप्रित्यर्थ व्यावसायिकांतर्फे बुधवारी आनंद साजरा करण्यात आला. महापालिकेने फायर फी माफ केल्याचे पत्र सराफ संघास दिले. याचा आनंद साजरा करण्यासाठी भाऊसिंगजी रोडवर गुजरी कॉर्नर येथे संघाच्यावतीने फटाके वाजवून साखर-पेढे वाटण्यात आले.
यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक शिवाजी पाटील, संजय जैन, महेंद्र ओसवाल, ललित गांधी, प्रीतम ओसवाल, किशोर परमार, सुहास जाधव, विजय हावळ, राजेश राठोड, शीतल राठोड, मनोज राठोड, राजेंद्र पोतदार, शीतल पोतदार, राजू बारस्कर यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सराफ व्यावसायिकांना महापालिकेच्यावतीने फायर फी लागू करून ती वसूल करण्यासाठी वेळोवेळी विविध माध्यमातून मागणी केली जात होती. मात्र फायर फी चुकीच्या पद्धतीने लागू केली असून त्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि संचालकांनी दाखवून दिले. त्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. निवेदनांच्या माध्यमातूनही महापालिकेला सांगितले होते. यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे व इतर पदाधिकाऱ्यांनीही मोठे सहकार्य केले.
सभासदांचे सत्कार…..
दरम्यान, संस्थेचे ज्येष्ठ सभासद जवाहर गांधी यांची श्री वासूपूज्य जैन श्वेतांबर ट्रस्ट, महावीरनगरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच ओपन वॉटर मॅरेथॉनमधील विजेते दिनकर लाळगे व अमर पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.