कोल्हापूर • प्रतिनिधी
जाणीव फौंडेशनमार्फत ५० गरजू महिलांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये साखर, चहापूड, तूरडाळ, मूगडाळ, रवा, पोहे, शेंगदाणे, चटणी, हळदपूड, हरभरा, मीठ, तेल इत्यादी साहित्य आहे.
जाणीव फौंडेशन ही वंचित, निराधार, गरीब, गरजू मुलांच्या, महिलांच्या अधिकारावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे. सध्या, कोव्हीडजन्य परिस्थितीमध्ये सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार बुडाले तसेच होतकरू व गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. त्यामध्ये रोज कमवून खाणाऱ्या महिलांवर देखील उपासमारीची वेळ आली. अशा ५० गरजू महिलांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अवनि संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते व इम्रान शेख उपस्थित होते. जाणीव फौंडेशनचे विश्वस्त सुषमा बटकडली व रघुनाथ पाटील तसेच इतर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
——————————————————-