जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; उद्या कलम १४४ लागू

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीकरीता संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या बुधवार, दि.५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या दिवशी  सकाळी ७ वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार बंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेश जारी केले आहेत.
    आदेशामध्ये पुढीलप्रमाणे कृती करण्यास बंदी घातली आहे- मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये राजकिय पक्षांचे बुथ स्थापीत करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापर करणे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणे, वापरणे अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. (निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास. (शस्त्र अधिनियम १९५९ मध्ये नमुद केले प्रमाणे) (सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून.)
     मतदान केंद्राचा तपशील, मतदान केंद्राचे नाव, पोलीस ठाणे, केंद्र संख्या याप्रमाणे:-
    डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दु हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज (आर्टस) आजरा, ता. आजरा – आजरा-२. केंद्रीय विद्यामंदीर, गारगोटी, ता. भुदरगड – भुदरगड-३. महात्मा फुले विद्यालय, कार्वे, ता.चंदगड – चंदगड-३. डॉ. झाकीर हुसेन विद्यालय, गडहिंग्लज, ता.गडहिंग्लज – गडहिंग्लज-३. श्री माधव विद्यामंदीर, गगनबावडा, ता. गगनबावडा – गगनबावडा-२. श्री. रामराव इंगवले हायस्कुल, हातकणंगले, ता. हातकणंगले – हातकणंगले-४. वि. स. खांडेकर प्रशाला, प्रतिभानगर, रेडयाच्या टकरीजवळ, कोल्हापूर – करवीर/ राजारामपुरी-४/२. श्री. शाहू हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, कागल, ता.कागल – कागल-४. फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी, बाघबीळ, पन्हाळा,ता.पन्हाळा – पन्हाळा-४. राजर्षी शाहू विद्यामंदीर, राधानगरी, ता.राधानगरी – राधानगरी-४. श्री.शाहू हायस्कुल, शाहूवाडी, ता.शाहूवाडी – शाहूवाडी-२. श्री पद्माराजे विद्यालय, ज्युनियर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग, शिरोळ, ता.शिरोळ – शिरोळ-३
      या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!