भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दिवाळी महोत्सवाचे आयोजन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापुरातील कावळा नाका येथील कार्यालयात दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
    या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ग्राहकांना खरेदीचा तर मुलांसाठी फनफेअर आणि फनी गेम्सचा आनंद लुटता येणार आहे.
   . महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवाळी महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये तोरण, आकाश दिवे, पणत्या, साबण, उटणे, परफ्युम, सिल्क साडी, कॉटन साडी, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, गाऊन, लहान आणि मोठ्यांसाठी रेडिमेड कपडे, होम डेकोर, बेडशिट, पडदे, रजई, तर दिवाळीसाठी खमंग फराळ, तसंच चटणी, लोणचे-पापड, रांगोळी, पर्स, फॅन्सी पाऊच, म्युरल्स, डेकोरेटिव्ह शो पीस, इमिटेशन ज्वेलरी यांचा समावेश आहे. या महोत्सवात आकर्षक बक्षिसंही ठेवण्यात आली आहेत. शिवाय मुलांसाठी मजेदार फन फेअर आणि फनी गेम्स, दररोज मनोरंजनात्मक खेळाचा आनंदही घेता येणार आहे. तसंच महिलांसाठी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी या महोत्सवाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *