स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन


कोल्हापूर • प्रतिनिधी   
     महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविड -१९ चा प्रार्दुभाव वाढल्याने मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना बाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
      सध्या महानगरपालिकेकडे पुरेशा प्रमाणात शेणी, लाकूड व गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. परंतु कोवीड -१९ चा प्रार्दुभाव पुढील काही महिने राहिल्यास अंत्यविधीसाठी पुरेशा प्रमाणात लाकूड व शेणी मुबलक उपलब्ध असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेकडून लाकूड व शेणी खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. तरी शहरातील सर्व सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळे, दानशूर व्यक्ती व नागरिकांना महापालिकेच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस शेणीदान करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *