• कमीतकमी मानकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीस परवानगी
कोल्हापूर • (जिमाका)
कोविड-१९ प्रादूर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी-पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना आज पाठविले आहे.
दरवर्षी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते. यावर्षी दि. २८ फेब्रुवारीपासून पुढील चार रविवारी श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची-नागरिकांची क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दि.२९ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील कोविड रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देवून त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, ऊरुस इत्यादीचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे दि. २८ फेब्रुवारीपासून पुढील चार रविवार संपन्न होणारे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी-पुजारी व भाविक यांच्या उपस्थिती पुजा करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येवू नये, असे यात म्हटले आहे.
———————————————–
The takeaway. generic cialis Read this next.