डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ.आंबेडकर यांचा पुतळा पूजन युवक उपाध्यक्ष कैलास कांबळे व राजू मालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
     या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराध्यक्ष आर. के. पोवार हे होते. यावेळी निरंजन कदम, अनिल घाटगे, संजय कुराडे, सुहास साळुंखे यांची समयोचित भाषणे झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात शहराध्यक्ष म्हणाले, एका मोठ्या लोकशाही देशाचा कायदा लिहिणे त्यात विविध जाती धर्म ,विविध प्रांत, विविध भाषा यांचा अभ्यास करून कायदा लिहिणे अतिशय अवघड काम डॉ. आंबेडकर यांनी केले, त्यांना त्रिवार अभिवादन.
      स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. आभार युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास जहिदा मुजावर, उत्तम कोराणे, रियाज कागदी, सुनील जाधव, संजय पडवळे, लालासो जगताप, अरविंद माने, युवराज साळुंखे, ,महादेव पाटील, राजेंद्र पाटील, सुनिता राऊत, सुमन वाडेकर, सुनील काटकर, राजू गवळी, नागेश जाधव, प्रशांत पाटील, जयकुमार शिंदे, बी. के. भास्कर, गब्बर मुल्ला आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *