• बँकेस मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त
कोल्हापूर • प्रतिनिधी
येथील रविवार पेठेतील आझाद चौक येथे डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या १५व्या शाखेचे उद्घाटन मंगळवारी विभागीय सहनिबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते व सहा.निबंधक प्रदिप मालगावेसो , जिल्हा उपनिबंधक प्रेमदास राठोड, श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखाना लि. शिरोळचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील , माजी नगरसेवक सत्यजीत ऊर्फ नाना कदम, श्री विरशैव को ऑप बँकचे चेअरमन राजेंद्र लकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.आर. मांगलेकर व ॲड. शिवाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक श्री दत्त शेतकरी सह साखर कारखाना लि. शिरोळचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी बँकेस मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झाल्याचे जाहीर केले व बँकेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरवासियांनी रूपये १० कोटीच्या ठेवी ठेऊन बँकेवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच श्री विरशैव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. मांगलेकर यांनी सहकारी बँकापुढील सद्यस्थिती व आव्हाने यांचा तपशील मांडला व बँकेबद्दल माहिती दिली.
यावेळी अध्यक्षस्थानी असलेले अरुण काकडे यांनी सहकार क्षेत्राबदल सविस्तरपणे माहिती देत सहकार टिकणे गरजेचे आहे, याबद्दल लेखाजोखा सर्वासमोर मांडला.
यावेळी बँकेचे चेअरमन महादेव बाबु राजमाने, व्हा. चेअरमन महेंद्र आप्पाण्णा बागे व सर्व संचालक मंडळ बँकेचे कार्यकारी संचालक जे. एम. बोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. ए. कदम, असि. जनरल मॅनेजर एम. ए. जगदाळे व सर्व सेवकवर्ग उपस्थित होते.
शेवटी सर्व मान्यवर, सभासद, ग्राहक, हितचिंतक व उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक दामोदर सुतार यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. ज्योत्स्ना गायकवाड यांनी केले.