कोल्हापूर • प्रतिनिधी
नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासीशाळेचा खेळाडू डॉ. अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे सानीपिना राव विशाखापटनम यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील सांस्कृतिक सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये विविध राज्यातील निवडलेल्या विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांचा मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र,गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. पंडित श्यामसुंदर महाराज, सोलर आळंदीकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल प्रशिक्षक पंकज रावळू, आशिष रावळू, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके, आकाश कोरगावकर यांचे सहकार्य लाभले आहे. आई डॉ.सौ.मनिषा गोंधळी, वडील डॉ. संदीप गोंधळी व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे अथर्वने बोलून दाखविले.
——————————————————-