डाॅ.अथर्व गोंधळी इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      विश्वविक्रमवीर डाॅ.अथर्व संदीप गोंधळी (वय १६ वर्षे) यास बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
     दिल्ली स्टेट युनिव्हर्सिटीच्या AIIPPHS च्या कुलगुरू डॉ. अंजू भंडारी, रजिस्टर के. डी. आर्या, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक (कळंबा) चंद्रामणी इंदुरकर यांच्या हस्ते डॉ. अथर्वला सन्मानित करण्यात आले.
टोप संभापूर (ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी १२ तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंगमध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. डॉ. अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आला आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!