डॉ.अथर्व गोंधळी भारतीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशनतर्फे डॉ.अथर्व संदीप गोंधळी यास भारतीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे पदमश्री नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे, उपाध्यक्ष ग्रीष्मा जाधव, सुनीता देशपांडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी देशातील विविध राज्यांमध्ये विविध क्षेत्रात  कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
       कोल्हापूरमधील नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ. अथर्व गोंधळी याने नुकताच यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे. डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३  या स्पर्धेमध्ये डॉ.अथर्वने स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किलोमीटर रनिंग २१ किलोमीटर अशी सलग नऊ तास असणाऱ्या या स्पर्धेमध्ये  सहभागी होऊन ६ तास ३४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली होती. या स्पर्धेत देशभरातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते. खूप कमी वयात आणि कमी वेळेत अथर्वने ही स्पर्धा पूर्ण केली होती.
       कोल्हापूर जिल्ह्यातील टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंगमध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. डॉ. अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे. बालपणापासून तायक्वांदो, कुडो, सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली आहेत. सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे. सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि हायरेंज वर्ल्ड रेकॉर्ड आणि कलाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नॅशनल रेकॉर्ड अशा १० जागतिक विक्रमांमध्ये नोंद झाली आहे. याचीच दखल ही द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू यांनी घेऊन त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती. त्याच्या या यशामुळेच  त्याला ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशनतर्फे  भारतीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू, आशिष रावळू, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके, आकाश कोरगावकर, अमोल कोरगावकर, आई सौ.मनीषा गोंधळी व वडील संदीप गोंधळी यांचे सहकार्य लाभले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!