कोल्हापूर • प्रतिनिधी
नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ. अथर्व संदीप गोंधळी यांने यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे.
डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेमध्ये डॉ.अथर्वने स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किलोमीटर रनिंग २१ किलोमीटर अशी सलग नऊ तास असणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ६ तास ३४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धेत देशभरातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते. खूप कमी वयात आणि कमी वेळेत अथर्वने ही स्पर्धा पूर्ण केली असून त्यामुळे डॉ. अथर्व यंगेस्ट बर्गमॅन ठरला आहे.
अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू, आशिष रावळू, क्रीडाशिक्षक विक्रमसिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके, उदय पाटील, वैभव बेळगावकर यांच्यासह आई-वडिलांचे सहकार्य लाभले.