महापालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने बुधवारी महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर बिंदू चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
      यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त निखील मोरे, रविकांत आडसूळे, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, संजय भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!