शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
    विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
     यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *