डॉ. चेतन पाटील यांची बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी निवड


कोल्हापूर • प्रतिनिधी  
     शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या सिव्हिल शाखेच्या डॉ. चेतन पाटील यांची इंडिया चाप्टर ऑफ अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिटयूट या नामांकित संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी निवड झाली. हि निवड २०२१-२३ या कालावधीसाठी आहे.  
     प्रो. चेतन पाटील हे संजय घोडावत विद्यापीठ स्टुडन्ट चाप्टर ऑफ अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिटयूटच्या मार्फत गेले पाच वर्षे कार्यरत आहेत. तसेच डॉ. चेतन पाटील यांना एप्रिलमध्ये विश्वेश्वरय्या टेकनिकल युनिव्हर्सिटी, कर्नाटकमधून सिव्हिल इंजिनिअरींग या शाखेतून पीएच डी पदवी प्राप्त झाली आहे. परफॉर्मन्स बेस प्लास्टिक डिसाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा त्यांचा रिसर्च एरिया होता. त्यासाठी त्यांना हुबळी येथील डॉ. विरगोंडा पाटील आणि अवसरी पुणे येथील डॉ. स्वप्नील खरमाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
      या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन. के. पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *