घोडावत विद्यापीठाच्या डॉ. पाटील यांची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या फार्मसी विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अभिनंदन पाटील यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डीमध्ये सुवर्णपदक पटकावले. याची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेऊन त्यांना वैद्यकीय आणि औषध निर्माणशास्त्रामध्ये सुवर्ण पदकांची हॅटट्रीक करणारा जागतिक पातळीवरील संशोधक म्हणून गौरव केला आहे. तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनेही डॉ. अभिनंदन पाटील यांच्या यशाचे कौतुक करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे. 
      प्रा. डॉ. अभिनंदन पाटील यांनी औषध निर्माण शास्त्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. त्यांनी कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर योग्य औषध मिळावित यासाठी आपल्या संशोधनावर भर देऊन त्यांनी त्यावरील संशोधन केले. २०११ साली पदवीच्या अभ्यासक्रमात त्यांनी शिवाजी विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले, त्यानंतर २०१३ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमातही सुवर्ण पदक पटकावले.
      डॉ. पाटील यांनी २००७ सालापासूनच संशोधनावर भर देऊन औषधनिर्माण शास्त्रातील आपला संशोधन प्रकल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केला. याची दखल जपानमधील टोकियो विद्यापीठाने घेऊन २०१२ साली त्यांचा यंग सायंटिस्ट म्हणून गौरव केला. त्यानंतर २०१३ साली कॅन्सरवरील संशोधनाबद्दल आंध्रप्रदेश सरकारनेही यंग सायंटिस्ट म्हणून गौरविले. त्याचबरोबर २०१२ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी म्हणून डॉ. अभिनंदन पाटील यांना गौरविण्यात आले होते.
      या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव विंग कमांडर (से.नि.) डॉ.संदीप सिंग, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, स्कुल ऑफ फार्मसी विभागाचे डीन डॉ. श्रीनाथ यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!