डॉ. कुंभार यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेतलेली भरारी प्रेरणादायी: कुलगुरू

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून येऊन जिद्दीने, स्वयंस्फुर्तीने इंग्रजीसारख्या विषयामध्ये प्राविण्य मिळवून समाजामध्ये डॉ.अर्जुन कुंभार यांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी काढले. 
     विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुरगुड येथील सदाशिवराव मंडलीक कॉलेजचे प्राचार्य, डॉ.अर्जुन कुंभार लिखित ”अर्जुनाचे एकलव्यायन” या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी कुलगुरू डॉ.शिर्के अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ.माया पंडीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, भाषेच्या प्रवासामध्ये आपण आपली ओळख विसरून जात आहोत.  या पुस्तकामध्ये आपल्या भाषेची ओळख स्पष्टपणे दिसून येते.  विद्यार्थी, शिक्षकांना इंग्रजीचे न्यूनगंड बाजूला ठेवून नवी उभारी देणारे हे प्रेरणादायी पुस्तक आहे.
     डॉ.बी.एम.हिर्डेकर, डॉ.माया पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. कुंभार म्हणाले, माझ्या जडण-घडणीमध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड वाटत असेल तर हे पुस्तक त्यांना दिलासा देईल. विद्यार्थी, शिक्षकांना यामधून इंग्रजी शिकण्याची नव ऊर्जा प्राप्त होईल.
    यावेळी डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.भालबा विभूते, डॉ.राजेंद्र कुंभार, डॉ.अच्युत माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  विठ्ठल कोतेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!