मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष समितीकडून डॉ.प्रकाश गुणे यांचा सत्कार

Spread the love


कोल्हापूर •प्रतिनिधी
      शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेंटनरी कमिटीच्यावतीने आज डॉ. प्रकाश गुणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
     कोल्हापूरातील सुप्रसिद्ध यूरोओलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे, सौ.अनुराधा गुणे व त्यांचे कुटुंबीय यांनी भारतीय सैन्यदलाच्या सशस्त्र सेनादले युद्धग्रस्त पुनर्वसन कोषात एक कोटी रुपयांचा मदत निधी देऊन कोल्हापूरकरांची दानशूर ही ओळख अधोरेखित केली. या त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल केएमएच्या सर्व माजी अध्यक्षांच्या समितीच्यावतीने डॉ. प्रकाश गुणे यांच्या कार्याचे कौतुक करून सत्कार करण्यात आला. डॉ. गुणे यांना यावेळी आर्टिस्ट विजय टिपुगडे यांनी साकारलेली ऐतिहासिक संध्यामठची कलाकृती भेट देण्यात आली.
     कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार डॉ. संदीप साळोखे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सचिव डॉ. उद्धव पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शतक महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
     आपण दिलेल्या निधीचा चांगला विनियोग हा संरक्षण खात्यातच होईल असे वाटल्याने हा निधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. एवढी मोठी रक्कम दिल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे डॉ. प्रकाश गुणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
     या समारंभास डॉ. हणमंत पाटील, डॉ.अजित चांदेलकर, डॉ. बी.जी जाधव – ढेकळे उपस्थित आदी होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!